Varsha Gaikwad : धारावीत मशिदीचे बेकायदा बांधकाम वाचवायला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड सरसावल्या!!

Varsha Gaikwad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : धारावीतील मशिदीचे बेकायदा बांधकाम पाडायला मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक गेले. त्या पथकावर जमावाने दगडफेक केली. त्यांचे वाहन मोडले. पण मशिदीचे बेकायदा बांधकाम वाचवायला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड पुढे सरसावल्या.

धारावीतील मशिदीचे मूळचे बांधकाम 60 वर्षे जुने आहे. 4 वर्षांपूर्वी नुतनीकरण करताना मशिदीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून जास्त जागा बळकावली. तिथे कच्चे आणि पक्के बांधकाम केले. मुंबई महापालिका प्रशासनाने अनेक नोटीसा पाठविल्या. पण मशिदीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविले नाहीच, उलट प्रशासनावर कायम दादागिरी केली.

शेवटी आज सकाळी मोठा फौजफाटा घेऊन महापालिका प्रशासनाचे अधिकारी मशिदीचे बेकायदा बांधकाम पाडायला गेले, तेव्हा जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. जमावाने धारावी तणाव निर्माण केला. पण त्याबद्दल जमावाला जमावातल्या म्होरक्यांना काही सुनावण्यापेक्षा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड या मशिदीचे बेकायदा बांधकाम वाचवायला पुढे सरसावल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मशिदीवर आणि धार्मिक स्थळांवर कुठलीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन देऊन देखील मशीद पाडायला बुलडोझर पाठविला, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला, तर कायदा हातात घेऊन बेकायदा बांधकाम वाचवायचा कोणी प्रयत्न करू नये, असा टोला शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हाणला

Varsha Gaikwad rushed to save the illegal construction of the mosque in Dharavi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात