विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.Uddhav Thackeray’s announcement to build a new city in Shirdi, Gadkari welcomed the decision of the Chief Minister, said- excellent decision
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. तेव्हा शिर्डी विमानतळ परिसरात स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं नितीन गडकरी यांनी स्वागत केलंय.
केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
तेव्हा गडकरी म्हणाले की , ‘मी काल परवा वर्तमानपत्रात वाचलं की माननीय उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील विमानतळाच्या परिसरात स्मार्ट सिटी वसवण्याचा निर्णय घेतला. फार चांगला निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला आता रोड बनला, एअरपोर्ट बनला की मी दिल्लीत बघतो की पहिले पुढारी येतात आणि म्हणतात की अलाईन्मेंट दाखवा, कुठून रोड चाललाय.
पुढे गडकरी म्हणाले की , मी म्हणतो कशासाठी की जागा घेऊन ठेवतो आम्ही. त्यामुळे आता पुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी सरकारनं जागा घेतली पाहिजे, असा माझा आग्रह आहे. त्या जागेवर तुम्ही डेव्हलपमेंट करा. स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करा. यासाठी मी पूर्ण मदत करेल. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक केलंय.
विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक दर्शनासाठी येत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल, तसेच रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी चालना मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App