विशेष प्रतिनिधी
मुंबई : ईडी ने नुकताच वरळी येथील सीजे हाऊस मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जप्त केले आहे. या बंगल्याची किंमत 190 कोटी रुपये इतकी आहे.
Bhushan Power & Steel Lt. Bank Fraud ! ED attaches Rs. 190 crore mumbai building in bank fraud
2019 मध्ये भूषण पॉवर स्टील लिमिटेड या कंपनीवर आर्थिक तपास यंत्रणेने कंपनीतील गैरव्यवहारा बाबत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्या अंतर्गत या कंपनीवर मनी लॉण्डरिंगचे आरोप केले होते. बँकांना चीट केल्याच्या आरोपावरून तसेच काही वित्तसंस्था आणि सरकारी खात्यातील काही लोकांचा वापर करून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आर्थिक तपास यंत्रणेने भूषण पॉवर स्टील कंपनी लिमिटेड आणि यांच्याविरूद्ध केला होता.
ED ची समन्स टाळून अनिल देशमुख पुरावे नष्ट करताहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; त्यांना फरार जाहीर करण्याचीही मागणी
सीबीआयने दाखल केलेला एफआयआर नुसार भूषण पॉवर स्टील कंपनीने 2018 या काळापर्यंत एकूण 33 बँका आणि इतर वित्तीयसंस्था यांचेकडून कर्ज घेतले होते. 30 जानेवारी 2018 पर्यंत ह्या कर्जाची एकूण रक्कम 47,204 कोटी रुपये इतकी झाली होती. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेडच्या संचालकांनी या कर्जाची परतफेड करण्यातसाठी कोणतीही रक्कम आजपर्यंत कोणत्याही बँकेत जमा केली नाहीये. तर कंपनीचे बँकेसोबतचे सगळे व्यवहारे अनियमित आहेत. पंजाब नॅशनल बँकेने 31 डिसेंबर 2015 रोजी भूषण पॉवर स्टील लिमिटेड कंपनीच्या सर्व खात्यांना ‘नॉन परफॉर्मिंग असेट’ म्हणूनही घोषित केले होते.
ईडीचे असे म्हणणे आहे की, या सर्व व्यवहाराच्यावेळी देण्यात आलेली संबंधित कागदपत्रे आणि बँक खाते सर्व बनावट आहेत. या व्यवहाराची खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की, बँकेकडून कर्जाच्या रुपात घेण्यात आलेली रक्कम वरळी मधील सीजे बंगल्याच्या खरेदीसाठी वापरण्यात आली होती.
ईडीने याविरुद्ध 25 जणांविरुद्ध आरोप दाखल केला असून 4420.16 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App