विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आपल्या 20 नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदेंनी बंड केले. पक्ष फोडला. 40 आमदार सोबत घेऊन भाजपच्या वळचणीला गेले. हा संभाव्य धोका पुन्हा होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आत्ताच दक्ष झाल्याचे समजते. Uddhav Thackeray
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त आमदारांना मार्गदर्शन केले. विधानसभेत जरी समोर फडणवीस असले, तरी तुम्ही 20 आहात. त्यांना पुरून उरा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते यांची निवड करण्यात आली.Uddhav Thackeray
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक 20 आमदार निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित 20 आमदारांची उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव माहडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. त्यावेळी त्यांनी एकटे असूनही विधानसभा गाजवली होती. पण तुम्ही आता 20 आहात, त्यामुळे आपल्या मुद्द्यांनी आणि भूमिकेने विधानसभा गाजवा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले.
Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल का मात्रा??
पक्षफुटीचा धोका! उद्धव ठाकरेंनी आमदारांना केले शपथबद्ध
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर तसेच पक्षफुटीचा मोठा अनुभव घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे विजयी आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतल्याची माहिती आहे. दगाफटका होऊ नये तसेच पक्षफुटीचा धोका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांकडून हे शपथपत्र लिहून घेतले. पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे हे शपथपत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतल्याची माहिती आहे.
प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते नियुक्त
या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते निवडण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. सुनिल प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश विनम्रपणे स्वीकारावा लागतो. अन्यथा आदित्य ठाकरे यांची विधानसभा गटनेते पदी निवड व्हावी, असे माझे मत होते, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App