विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane भाजप अन् बाळासाहेबांचे संबंध उद्धव ठाकरेंना समजणार नाही, तेव्हा ते कॅमेरा साफ करत होते, असे म्हणत भाजप आमदार नीतेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बागायतदारांसाठी असंख्या योजना आहेत ते उद्धव ठाकरेंना दिसत नाही. उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते?, असा सवाल भाजप नेते नीतेश राणे यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Nitesh Rane
दरम्यान नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, 23 तारखेनंतर तुम्ही बेरोजगार होणार. पुतळा तयार झाला की फोटोग्राफीची ऑर्डर तुम्हाला देणार असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यांच्यासभेत विकासाचा एकतरी मुद्दा आला का? आला असेल तर तो मला दाखवणाऱ्यास मी बक्षीस देतो, दरोडेखोर कोण आहेत ते चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितले म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागेल आहे.
त्यांना घराणेशाही बोलण्याचा अधिकार नाही
नीतेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे घराणेशाहीवर बोलले. पण ते उभ्या असलेल्या स्टेजवर जरी लक्ष दिले असते तरी त्यांना लक्षात आले असते की घराणेशाही काय असते. त्यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. या विषयावर त्यांनी पीएचडी केली आहे, कालच्या सभेच्या भाषणावेळी लोकं त्यांना हसत होते, त्यांची ही टेप रेकॉर्डर जुना झाला आहे.
मग सामनात जाहीराती कशा चालतात
नीतेश राणे म्हणाले की, भाजपा आणि शिंदे यांच्या जाहिराती समानामध्ये का चालतात? भाजपा आणि नेत्यांच्या जाहिरातीवर आक्षेप असेल तर छापू नका. महायुतीचा पैसा चालतो, केवळ सकाळी उठून खडी फोडायची, अशा डबलढोलकी पणाला जनता चांगली ओळखते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गौतम अदानींसोबत बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करायची हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे. अदानी चालत नाही तर त्यांचे विमान कसे चालते असा सवानलही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App