विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेने त्यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समोरून उमेदवार देत मातोश्रीवरून मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर उपरोधक टीका केली आहे.Amit Raj Thackeray
अमित ठाकरे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून तिथे उमेदवार दिला जाणार नाही, अशी चर्चा होती. परंतु, अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर करत महेश सावंत यांना माहीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
काय म्हणाले अमित ठाकरे?
माहीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर मातोश्रीवरुन शुभेच्छा मिळाल्या का?, असा प्रश्न एका मुलाखतीत अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर शुभेच्छा मिळाल्या ना, असे म्हणत समोरुन उमेदवार दिला, त्याच मातोश्रीवरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली.
तुम्ही आमचे 6 फोडले, नियतीने तुमचे 40 फोडले
अमित ठाकरे म्हणाले, मी आजारी असताना माझे 40 आमदार फोडल्याचे ते म्हणतात. पण 2017 मध्ये मी आजारी असताना तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले. तुम्ही जर आम्हाला मागितले असते तर राज ठाकरे यांनी असेच दिले असते. आमचे नगरसेवक फोडताना तुम्हाला तुमची चूक दिसली नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे. शेवटी कर्म कोणालाही चुकत नाही. तेव्हा तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले, तर आता नियतीने तुमचे 40 आमदार फोडले, अशी टीकाही अमित ठाकरे यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App