विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sunil Kedar विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराऐवजी तेथील बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कथित अवमानाचा बदला घेण्याचे अजब तर्कट मांडले आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या प्रकरणी केदार यांच्यावर रामटेकमध्ये गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. Sunil Kedar
महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेक विधानसभेची जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यांनी तिथे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. पण काँग्रेस नेते सुनील केदार मात्र बरबटे यांच्याऐवजी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहेत. काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे ही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या या कृतीविषयी पत्रकारांनी त्यांना छेडले असता सुनील केदार यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी मुळक यांचा प्रचार करत असल्याचा युक्तिवाद केला आहे.Sunil Kedar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जैस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. त्यांचा अवमान केला. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे. मी व श्यामकुमार बर्वे यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे, सुनील केदार म्हणाले. त्यांच्या या अजब तर्कटावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.Sunil Kedar
शिवसेना दुसऱ्याच्या काठीने विंचू मारत नाही
भास्कर जाधव म्हणाले, दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढे आम्ही दुबळे झालो नाहीत. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली हीच वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे पूर्व विदर्भातील 28 जागांचे कार्यक्षेत्र आहे. तिथे आम्ही केवळ 1 जागा घेतली. तिथेही तुम्ही तुमचा बंडखोर उमेदवार उभा करतात. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता. ही गद्दारी नव्हे तर दुसरे काय?
तुम्ही उद्धव ठाकरे यांना कोणती मदत करत आहात? आम्ही पाहुण्यांच्या काठीने विंचू मारत नाही हे सुनील केदार यांनी लक्षात घ्यावे. सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे. आघाडी असताना कोणत्याही मित्रपक्षाने एवढा विश्वासघात करू नये, असे भास्कर जाधव म्हणाले.
आशिष जैस्वाल यांचा केदारांना चिमटा
दुसरीकडे, शिंदे गटाचे उमेदवार आशिष जैस्वाल यांनीही या प्रकरणी उद्धव ठाकरे व सुनील केदार यांचा चिमटा काढला आहे. सुनील केदार हे उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत आहेत. ठाकरे यांचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी त्यांना उघडे पाडले. यामुळे मतदारसंघात त्यांची प्रतिमा मलीन झाली. आता स्वतःची अब्रु वाचवण्यासाठी ते अशा प्रकारचा केविलवाना युक्तिवाद करत आहेत, असे ते म्हणालेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App