विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी जोशात आली विधानसभा निवडणूक कधीही होवो सत्ता आपलेच अशी स्वप्ने महाविकास आघाडीचे नेते पाहू लागले पण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या दोन सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचा परस्पर छेद गेला त्यामुळे महाराष्ट्राचे सत्ता समीकरण एकदम संतुलित झाले. Two surveys shows balance of power in maharashtra
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली 48 पैकी 31 जागा मिळवल्या महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले त्यामुळे महाराष्ट्रातले पुढचे सत्ता संतुलन महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्ण झुकले. विधानसभा निवडणुकीत मतदान व्हायचाच अवकाश महाविकास आघाडी सत्तेवर आलीच असा निष्कर्ष आघाडीच्या नेत्यांनी काढला त्या निष्कर्षाला सुरुवातीला टाइम्स नाव आणि मॅट्रिझ यांनी केलेल्या सर्वेक्षणाने छेद दिला. या सर्वेक्षणानुसार महायुतीला महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी तारले. महायुतीला विधानसभा निवडणुकीत 137 ते 152 जागा मिळतील, तर महाविकास आघाडी 129 ते 144 जागांवर थांबेल, असा निष्कर्ष आला. त्यामुळे महायुतीचे नेते खुश झाले.
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन
पण आता टाइम्स नाव आणि मॅट्रेस च्या सर्वेक्षणाला छेद देणारे लोक पोलचे सर्वेक्षण आले. यात महायुती 115 जागांवर थांबण्याचा निष्कर्ष निघाला तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणाने वर्तवली त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते खुश झाले.
गेल्या दोन दिवसांमध्ये दोन स्वतंत्र सर्वेक्षणे आली तिच्या निष्कर्षांचे परस्परांना छेद गेले त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या बाजूने जे सत्ता संतुलन पूर्ण झुकले होते, ते दोन सर्वेक्षणाच्या परस्पर विरोधी निष्कर्षांमुळे एकदम संतुलित झाले. महाराष्ट्राचे लढाई आता एकतर्फी राहिली नाही, तर ती चुरशीची झाली आज खरा निष्कर्ष या सर्वेक्षणांमधून समोर आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App