वृत्तसंस्था
पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. Two Murders in the States Home Minister’s Constituency
पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळच्या कोंदेवाडी फाट्यावर काल रात्री सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं.
जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते. यातूनच थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपींची त्यांचा मृतदेह नगर जिल्ह्यातील कोरथन घाटातील दरीत पेटवून दिला आणि गाडीजवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. थिटे आणि सूर्यवंशी याना पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना थोरांदळे येथे घडली. इथं द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्याला जखम झालेल्याअवस्थेत आढळला. मूळच्या त्या अहमदनगर जिल्ह्यातील असून आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या राहत होत्या.शेतात राबून उदरनिर्वाह करत होत्या. रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. बराचवेळ परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App