पुण्यातील ओशो आश्रमाचे दोन प्लॉट विकण्याचा घाट , शिष्यांचा आरोप ; राज्यपालांकडे धाव घेऊन बोली रोखण्याची मागणी


वृत्तसंस्था

पुणे : जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरु ओशो यांच्या पुण्यातील आश्रमातील दोन भूखंड बोली लावून विकण्याचा घाट विश्वस्तांनी घातला आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबविण्याची विनंती त्यांच्या शिष्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. Trustes of Osho Ashram are trying to sell two plots ; disciples accused; stop the bid Urges to the governor

ओशो यांच्या शिष्यांचे शिष्टमंडळाने हेमंत मलिक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली व ही विनंती केली आहे. कोरेगाव पार्क येथे ओशो यांचा आश्रम आहे. तेथील दोन प्लॉटच्या विक्रीचा घाट ओशो इंटर नॅशनल फाउंडेशन, चॅरिटेबल ट्रस्टने घाट घातला आहे. त्याला शिष्यांनी विरोध केला असून याबाबत फाउंडेशनची चौकशी करण्याची मागणी केली.



मलिक म्हणाले, आमच्या मागणीबाबत राज्यपाल सकारात्मक दिसले. कोरोना संकटामुळे झुरिच येथील ओशो इंटर नॅशनल फाउंडेशनने कोरेगाव पार्क येथील आश्रमाच्या रिसॉर्टचे दोन प्लॉट १०७ कोटींना विकण्याचा घाट घातला आहे. तसेच धर्मदाय आयुक्तलयालाकडे परवानगी मागितली आहे. हे प्लॉट प्रत्येकी १.५ एकरचे असून त्यामध्ये घर ,जलतरण तलाव, टेनिस कोर्ट आहे. हे सर्व बजाज आटोचे मालक राजीव बजाज यांना विकण्याचे ठरविले असून ते या प्लॉट शेजारीच राहतात. यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोरोना संकटामुळे ३.५ कोटींचे नुकसान झाले म्हणून विश्वस्त यांनी आश्रमाचा काही भाग राजीवनयन बजाज यांना १०७ कोटींना विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत मुंबई येथील धर्मदाय आयक्तांकडे अर्ज केला होता. पण, काही शिष्यानी पुढाकार घेऊन निधी दिला आणि विक्री रोखली होती. त्यामुळे ट्रस्टकडे निधी नाही, असे म्हणता येत नाही आणि प्लॉट विक्रीची गरज उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली असून विश्वस्त आणि व्यवस्थापक मंडळाची हकालपट्टी करावी, असे निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.

Trustes of Osho Ashram are trying to sell two plots ; disciples accused; stop the bid Urges to the governor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात