विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहराशेजारील कळंबा तलाव तुडूंब भरला आहे. Torrential rains in Kolhapur; Lake Kalamba overflow
तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निसर्गाचा एक अनोख रूप निमित्तानं पाहायला मिळतय. कळंबा तलाव ओसंडून वाहू लागल्याने कोल्हापूरकरांची पावले कळंबा तलाव परिसराकडे वळली आहेत. सांडव्या वरून पडणारे पाणी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. लहान मुलं तलावात पोहोण्याचा आनंद लुटत आहे तर अनेक जण कुटुंबासह या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App