राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका


विशेष प्रतिनिधी

सिकर : दरोडेखोरांनी चक्क पोलिस निरीक्षकाची मोटार पळविण्याचा प्रकार राजस्थानात घडल्याने सारे आवाक झाले आहेत. राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील रानोली परिसरात एका ढाब्यापाशी अज्ञात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिस निरीक्षक नरेंद्र खिचर प्रतिकार करण्यापूर्वीच दरोडेखोर मोटारीसह पसार झाले. Theft stolen police van in Rajsthan



सिंह आणि खिचर एका फरार आरोपीच्या शोधासाठी सिकरला मोटारीतून चालले होते. ढाब्यापाशी भोजन केल्यानंतर खिचर स्वच्छतागृहात गेले, तर महेंद्र मोटारीपाशी गेले. त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांना अडविले आणि मोटारीची चावी मागितली. महेंद्र यांनी प्रतिकार करताच त्यांनी गोळ्या झाडल्या. महेंद्र यांनी मोटारीच्या दारापाशी जाऊन दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तोपर्यंत खिचर आले, पण दरोडेखोरांनी महेंद्र यांच्याकडून चावी हिसकावून मोटार सुरु करून पलायन केले.

दरम्यान, यानंतर भाजपने राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. हे सरकार त्यांच्या आमदारांच्या दबावाखाली कारभार करीत असल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितले.

Theft stolen police van in Rajsthan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात