एक हजार कोटींची खाण पाच कोटींना दिली, राजस्थानात मोठा गैरव्यवहार; सिमेंटची खाण मार्बलची दाखविली


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानात काँग्रेसच्या राजवटीत कोरोना काळातील दुसरा मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या पूर्वी कमी दर्जाचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मोठ्या किंमतीला खरेदी केले होते. आता एक हजार कोटींच्या सिमेंटच्या दोन खाणी मार्बलच्या असल्याचे सांगून त्या ५ कोटींना दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. One thousand crore mine given to five crore, Major malpractices in Rajasthan; Cement mine shown as marble

राजस्थानात सिमेंट आणि मार्बलच्या खाणी आहेत. परंतु सरकारी नियमांप्रमाणे सिमेंट हे प्रथम श्रेणीचे आणि मार्बल हे दुय्यम श्रेणीचे खनिज मानले जाते. नेमक्या या फरकाचा गैरफायदा राज्याच्या खाण विभागातील भ्रष्ट मंडळींनी उठविला असून सिमेंटची खाण मार्बलची असल्याचे भासवून ती खाणकामासाठी लिलाव करून भाडेपट्ट्यावर दिली.



सिमेंट खाणीसाठी एक हजार कोटीचा महसूल सरकारला प्राप्त होणार होता. परंतु त्या मार्बलची खाण असल्याचे सांगितल्याने सरकारला केवळ पाच कोटींचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे.

प्रतापगड जिल्ह्यातील पिंपलखुंट तहसील क्षेत्रातील दाता येथे सिमेंट खाणींचे अनुक्रमे ७४२४९ आणि १०,४१६२ हेक्टरचे दोन पट्टे आहेत. त्यामध्ये हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे खाण विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोध अग्रवाल आणि खाण निर्देशक के. बी. पंड्या यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान खाणींचे लिलाव नियमानुसार झाल्याचे सुबोध अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. मार्बलमधून सरकारला चांगली रॉयल्टी मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
२०१५ मध्ये अशाच प्रकारचा गैरव्यवहार झाला होता.

आपत्तीत उखळ पांढरे ; काँग्रेसची संस्कृती

आपत्तीत स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याची काँग्रेसची संस्कृती आहे. आधी कोरोना काळात निकृष्ट दर्जाचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर चढ्या भावाने सरकारने खरेदी केले होते. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. आता मोठा महसूल मिळणारी खाण कवडीमोल भावाने विकून सरकारचा तोटा करून गैरव्यवहार केला गेला आहे.

विशेष म्हणजे दोन्ही घटना कोरोना या आपत्तीत घडल्या आहेत. आता याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोणते ट्विट करतात, याकडे लक्ष लागले आहे. आता गैरव्यहार चव्हाट्यावर आल्यावर ते ट्विट करणेच विसरून गेले असावेत.

One thousand crore mine given to five crore, Major malpractices in Rajasthan; Cement mine shown as marble

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात