‘’उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात’’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

CM Shinde and Uddhav Thakrey

खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिले आहे जोरदार प्रत्युत्तर

प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 40 आमदार भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार तोंडसुख घेतले. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जशासतसे प्रत्युत्तर दिले. Tomorrow Uddhav Thackeray can call Anil Deshmukh and Nawab Malik freedom fighters Maharashtra CM Eknath Shinde

”त्यांनी (उद्धव ठाकरे) स्वतःमध्ये डोकावले पाहिजे. आज जागा वेगळी होती, नाहीतर त्यांचे शब्द आणि आरोप तेच होते. उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात. त्यांच्या आरोपांना आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ.” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

याशिवाय, ”आम्ही राज्याला पुढे नेऊ. जनता पाहत आहे आणि त्यांना विकास कामे हवी आहेत आणि एकमेकांना शिव्या घालण्यात त्यांना रस नाही.” असंही उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.


रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!


शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे. तो निवडणूक आयोगाने स्थापन केला नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह चोर गटाला दिले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचवेळी जनतेने जर आपल्याला सांगितले तर आपण एका मिनिटात घरी जाऊ. वर्षा बंगला सोडला तेव्हा देखील मी सत्तेला शिकून राहिलो नव्हतो. तसेच जर जनतेने सांगितले तर मी पुन्हा घरी जाईन पण हा फैसला मी निवडणूक आयोग भाजप अथवा चोर गटावर सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता.

Tomorrow Uddhav Thackeray can call Anil Deshmukh and Nawab Malik freedom fighters Maharashtra CM Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात