विशेष प्रतिनिधी
सांगली : कोरोनाच्या महामारीवरून शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना हे निव्वळ थोतांड आहे असेही भिडे यांनी स्पष्ट केले असून मंदिरांचे टाळे काढण्यासाठी सर्वजण एकत्र येणार आहेत का ? असा सवाल त्यांनी केला. To remove the locks of the temple Will all come together: Bhide
मूळात कोरोना वगैरे काही नाही, असे सांगत कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. व्यापारी पेठा लवकर उघडाव्यात काहीही होणार नाही, उलट लॉकडाऊनमुळे लोकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनामुळे राजकीय नेते काय लायकीचे आहेत हे समजलं आहे. ते देशाचे सेवक नाहीत तर स्वतःचे पोशिंदें आहेत आणि स्वार्थी आहेत, अशी टीकाही संभाजी भिडे यांनी केलीय. आषाढी दिवशी सर्व मंदिरे का उघडत नाही ? असा जाब त्या दिवशी सर्वानी विचारला पाहिजे आणि मंदिरांचे टाळे काढण्यासाठी सर्वजण एकत्र येणार का ? असा सवालही भिडे यांनी उपस्थित केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App