विशेाष प्रतिनिधी
जगातला सगळ्यात मोठा दुग्ध उत्पादनातला ब्रांड अमूल नेहमीच करंट टॉपिक वर चुरचुरीत भाष्य करणारे डूडल करून आपली जाहिरात करून घेताना दिसतो. अशीच चुरचुरीत जाहिरात अमूलने एलन मस्क वर केली आहे. एलन मस्क याने नुकतीच ट्विटर कंपनी खरेदी केली. तब्बल 44 अब्ज डॉलरला झालेल्या या खरेदीची चर्चा डिजिटल विश्वात अजूनही जोरात सुरू आहे. या चर्चेचा फायदा घेण्यासाठी अमूलने “तू चीज बडी है मस्त मस्त” या लोकप्रिय हिंदी गाण्यावर आधारित “यह चीज बडी है मस्क मस्क”, अशी जाहिरात करून घेतली आहे. This thing is Buddy Musk Musk: Amul’s Crispy Doodle on Alan Musk after Twitter purchase !!
अमूलने आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी व्यक्तींवर जाहिराती केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर, माजी पंतप्रधान देवेगौडा आदींचा समावेश आहे. 1996 साली देवेगौडा अचानक पंतप्रधान झाल्यानंतर अमूलने त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर चुरचुरीत भाष्य करत “लंबी रेस का गौडा”, असे त्यांचे वर्णन केले होते. आज एलन मस्क याचे वर्णन अमूलने “यह चीज बडी है मस्क मस्क” या शब्दांत केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App