मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे आपली बनावट सही सुद्धा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.Mumbai Police files fake FIR in his name, Kirit Somyya hints to appeal in High Court

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं, खार पोलीस स्टेशनच्या परिसरात झालेला हल्ला, पोलिसांनी नोंदवलेला खोटा एफआयार या संदर्भात मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.



किरीट सोमय्या म्हणाले होते, ज्या पद्धतीने याच ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 70-80 शिवसेनेच्या गुंडांनी माज्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी एक बनावट एफआयआर तयार केली. ती एफआयआर खार पोलिसांना पाठवली. ही एफआयआर कॉपी मीडियाला दिली गेली.

त्या बनावट एफआयआरच्या आधारे संजय पांडे यांनी कारवाई सुरू केली. आयपीएसी 154 अंतर्गत एफआयआरवर किरीट सोमय्याची सही असायला हवी. हे मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती नाहीये का? सही नसताना मुंबई पोलिसांनी एफआयआर रजिस्टर्ड केली आहे ते उद्धव ठाकरेंच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे.

किरीट सोमय्या 23 एप्रिल रोजी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूवीर्ही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे.

Mumbai Police files fake FIR in his name, Kirit Somyya hints to appeal in High Court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात