कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ रूपरेषा व पुरस्कार जाहीर 


मोलाचे योगदानासाठी अशोक सराफ,रेणुका शहाणे,मोहन जोशी,पद्मिनी कोल्हापुरेंचा विशेष पारितोषिकाने सन्मान Konkan Film Festival – 2022 Outline and award announced


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोकणातील निसर्ग आणि तिथल्या पारंपारिक कला या महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने  ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेचे वतीने ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाची रूपरेषा व नामांकन प्राप्त चित्रपट व विजेत्यांची नावांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. Konkan Film Festival – 2022 Outline and award announced

या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.

या महोत्सवात चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या   अशोक सराफ,रेणुका शहाणे,मोहन जोशी,पद्मिनी कोल्हापुरे दिग्ग्ज कलावंतांचा विशेष पारितोषिकाने सन्मान केला जाणार आहे. या निमित्ताने या दिग्ग्जांचे आशीर्वादरूपी पाठबळ या महोत्सवाला लाभातील व आमच्यासाठी ते प्रेरणादायी असतील असं सांगत दिग्दर्शक विजय राणे  यांनी हा महोत्सव कलासृष्टीला वेगळ वळण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

झी’ टॉकीज ने नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचे नेहमीच स्वागत केले आहे. पहिल्यांदाच होणारा हा कोकण चित्रपट महोत्सव कलासृष्टीला व पर्यटनाला चालना देणारा असेल व यातून अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात हे लक्षात घेऊन झी’ टॉकीजने या महोत्सवासाठी पुढाकार घेतल्याचे  झी च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

या महोत्सवाची रूपरेषा पुढील प्रमाणे….

कोकण चित्रपट महोत्सव – २०२२

या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता वीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे होईल. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग ४ दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील या चार दिवसांत अंदाजे २५ ते ३० हजार प्रेक्षक हजर रहातील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या ८ तालुक्यात ४ दिवस दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आलेले १४ चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील. दिनांक १२ मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. चित्रपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्गात मामा वरेरकर नाट्यगृहात १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.
महोत्सवासाठी निवडण्यात आलेले चित्रपट आणि घोषित पुरस्कार  पुढील प्रमाणे

  • कथा- रमेश दिघे- फनरल
  • पटकथा-रमेश दिघे- फनरल
  • संवाद – संजय पवार- रिवणावायली
  • गीतकार- गुरु ठाकूर-नवा सुर्य- फिरस्त्या
  • ध्वनी मुद्रक- सत्यनारायण-प्रवास
  • ध्वनी संयोजन- परेश शेलार- जीवनसंध्या.
  • वेशभुषा- अर्पणा होसिन- कानभट्ट
  • रंगभुषा- संजय सिंग- कानभट्ट
  • कलादिग्दर्शक- सतीश चिपकर- कानभट्ट
  • पार्श्व संगीत- चिनार- महेश- चोरीचा मामला
  • संगीत- अतुल भालचंद्र जोशी- जीवनसंध्या
  • गायक पुरुष- आर्दश शिंदे- नवा सुर्य- फिरस्त्या
  • गायक (स्त्री) – अंजली मराठे  आल्या दिसा मागे – रिवणावायली
  • संकलक- निलेश गावंड- फनरल
  • छायाचित्रकार- संजय मेमाणे- हिरकणी
  • नृत्य दिग्दर्शक- फुलवा खामकर- केळेवाली- पांडू

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

  • रणवीरसिंग राजे गायकवाड – भारत माझा देश आहे
  • देवांशी सावंत- भारत माझा देश आहे
  • रुचित निनावे- पल्याड
  • ऋग्वेद मुळे- कानभट्ट
  • मृणाल जाधव- मी पण सचिन
  • उत्कृष्ट १४ चित्रपट

जीवनसंध्या,फनरल,कानभट,भारत माझा देश आहे,८ दोन ७५, पल्याड,हिरकणी,प्रितम,प्रवास,मी पण सचिन,सिनियर सिटीझन,रिवणावायली,फिरस्त्या,शहिद भाई कोतवाल.

Konkan Film Festival – 2022 Outline and award announced

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात