कोकणातील चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी पाच तासाचा धावता दौरा केलेल्या उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक का केले होते हे पुन्हा दिसून आले आहे.Therefore, Nitesh Rane praised Eknath Shinde and advised Uddhav Thackeray to follow his example
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी पाच तासाचा धावता दौरा केलेल्या उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक का केले होते हे पुन्हा दिसून आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालघर जिल्ह्याचा दौरा केला होता. पालघर शहरात घरावर झाड पडून दहा घरांचे नुकसान झाले होते. या घरातील प्रत्येकी कुटुंबांना दहा हजाराची व घरासाठी पत्रे अशी वैयक्तिक मदत शिंदे यांनी तत्काळ दिली.
शिंदे यांनी उसगाव डोंगरी येथील विवेक पंडित यांच्या विधायक संसद या विलगिकरण केंद्राला भेट दिली. पुढे मनोर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथेही आर्थिक मदत केली.
पालघर तहसीलदार कार्यालयात गरजूना त्यांच्या हस्ते रास्त धान्य वाटप केले गेले. माहीम टेम्भी येथील नुकसानग्रस्त मच्छिमार कुटुंबांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले.
उध्दव ठाकरे यांनी कोकणच्या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला होता. मात्र, केवळ मदतीचे आश्वासन दिले होते. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, कोकणातील जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं.
पण उद्धवजींनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नात उद्धवजींना कळलं असतं तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धवजींपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. शिंदेंनी किमान कोकणवासियांना मदत तरी पाठवली.
त्यामुळे बाळासाहेबांचा मूळ शिवसैनिक कसा असतो हे शिंदेंनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभारच मानेन. त्यामुळे शिंदेंकडून काही तरी शिका, असा माझा मुख्यमंत्र्यांना सल्ला राहीन.
दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या कौतुकामुळे एकनाथ शिंदे यांनाही कानकोंडे झाले आहे. ते म्हणाले, वादळामुळे नुकसान झालेल्या जनतेला मदतीची आवश्यकता आहे. यावेळी राजकारण करणे योग्य नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App