नितेश राणे यांच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या गोपनीय ठेवलेल्या ताडोबा सहलीचे फुटले बिंग…


भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची ताडोबा टूर उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही टूर पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही याबाबतची माहिती नव्हती.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची ताडोबा टूर उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही टूर पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही याबाबतची माहिती नव्हती.  Aditya Thackeray Tadoba tour unveiled after Nitesh Rane allegations

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे सलग तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता. या दौऱ्यात त्यांनी व्याघ्र सफारीचा आनंद लुटला. या दौºयात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती कोणालाही नव्हती. एका रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. रिसोर्ट कंपनीनेही या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौºयाची सर्वांना माहिती झाली होती.आदित्य ठाकरे १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चिमूर मार्गे ताडोबा प्रकल्पात दाखल झाले. त्यानंतर ते सलग दोन दिवस म्हणजे १६ व १७ मार्च दुपारपर्यंत ताडोबात मुक्कामी होते. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वगळता ठाकरे यांच्या दौºयाबाबत कुणालाही माहिती नव्हती. त्यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता असे सांगण्यात आले. १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ते ताडोबातून बाहेर पडले. त्यानंतर थेट नागपूर विमानतळ गाठून मुंबईला रवाना झाले.

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिघडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे सुट्टीवर गेले असून, ते ताडोबाची सफर करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. राज्यात आणि मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. आज १७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र हे सारे घडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाच्या सफरीवर असून, ते सुट्टीचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. मग आता मुंबईला वाचणवार कोण? असा सवाल राणे यांनी केला होता.

Aditya Thackeray Tadoba tour unveiled after Nitesh Rane allegations

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती