विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मोठा दावा केला आहे. महायुतीत बरीच गडबड असून अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरूवात झाली असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.There is a lot of confusion in the Grand Alliance, many leaders are in touch with us, claims Congress leader Balasaheb Thorat
भुजबळांचे दुसरेही कारण असेल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कराडमध्ये झालं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवारांच्या भेटीबद्दलचं कारण भुजबळांनी सांगितलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु, दुसरंही कारण असू शकत, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
काही लोकांनी क्रॉस व्होटिंग केले
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची फडणवीस आणि अजितदादांसोबत बैठक झाली होती, या मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, ते आम्हाला माहीत नाही. परंतु, काही लोकांनी क्रॉस वोटिंग केलं असून त्याबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडे आली आहे. त्याबद्दलचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे. संबंधितांबद्दलचा निर्णय योग्य वेळी होईल.
जातीय संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न व्हावा
मराठा-ओबीसी संघर्षावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, छगन भुजबळांचं शरद पवारांशी काय बोलणं झालं, पवारांनी त्यांना काय सांगितलं, हे आपल्याला माहिती नाही. परंतु, राज्यात निर्माण झालेला जातीय संघर्ष थांबवायचे प्रयत्न झाले पाहिजेत. असे प्रश्न रस्त्यावर उतरून सुटत नाहीत. विधान परिषद निवडणुकीत आमच्याकडे जेमतेम मतं होती. आमचे मित्र पक्ष आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातील लोकांची मते मिळाली तर जयंत पाटलांचा विजय होईल, अशी अपेक्षा होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App