विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असा हल्लाबोल भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. प्रीतम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश केला नसल्याबद्दल त्यांची खदखद बोलून दाखविल्याचे म्हटले जात आहे.The rites of begging are not in our blood, says Pankaja Munde
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे.
तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत.
मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज आहेत. यावेळी मुंडे भगिनी समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा यांनी दिल्लीला वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App