विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील महविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. तर, ते त्यांच्या कर्माने केव्हाही पडेल असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी व्यक्त केले. रवी यांच्या उपस्थितीत संघटनमंत्री, शहर भाजप पदाधिकारी आणि दाक्षिणात्य आघाडीच्या बैठका झाल्या. ना रवी म्हणाले,The Mahavikas Aghadi government will fall because of his deeds, C. T. Ravi believes
‘गेल्या दीड वर्षांत महविकास आघाडी सरकारची ओळख वसुली सरकार अशी झाली आहे. हे सरकार कोणतेही ठोस आणि जनहिताचे निर्णय घेत नाही. त्यांनी घेतलेले निर्णय त्यांना किंवा न्यायालयाला बदलावे लागत आहेत.
केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारधारा असणाऱ्या तीन पक्षांनी अनैसर्गिक आघाडी सत्ता स्थापन केली आहे. परंतु त्यांच्यात एकवाक्यता नाही. अंतर्विरोधातून हे सरकार केव्हाही पडेल. आम्ही ते पाडण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App