जलालबादमध्ये नागरिकांनी काढून टाकला तालिबानचा झेंडा, विरोधात केली निदर्शने


विशेष प्रतिनिधी

जलालाबाद – फारसा संघर्ष न होता संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद येथे नागरिकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. विरोध करणाऱ्या नागरिकांवर तालिबान्यांनी गोळीबारही केला. या गोळीबारात किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.People oppose Taliban in Jalalabad

सर्वांना सामावून घेत शांततेने सरकार चालविण्याचे आश्वाासन तालिबानने दिले असले तरीही त्यांच्यावर नागरिकांचा फारसा विश्वावस नाही. जलालाबाद येथे काही नागरिकांनी तालिबान्यांचा झेंडा खाली घेत त्या जागी अफगाणिस्तानचा झेंडा फडकाविला. त्यांनी तालिबान्यांविरोधात घोषणाही दिल्या. त्यांना पांगविण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला. तसेच, नागरिकांना मारहाणही केली.या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दहशतवाद्यांनी मारहाण केली. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तालिबानने मात्र, आपण सर्वसमावेशक सरकार स्थापण्यास तयार असून माजी अध्यक्ष हमीद करझाई यांच्याबरोबर बोलणीही सुरु केली आहे, असे सांगितले.

People oppose Taliban in Jalalabad

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती