विशेष प्रतिनिधी
सांगली : बैलांच्या संवर्धनासाठी बैलगाडा शर्यत घेणारच असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रँक बनवून बैलगाड्या शर्यत घेतल्याच.आटपाडी तालुक्यात निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर शुक्रवारी सकाळी शर्यती पार पडल्या.Gopichand Padalkar’s guerrilla technica, bullock cart races made a five kilometer track at night
बैलगाडी शर्यतींवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आ. पडळकर यांनी बैलांच्या संवर्धनासाठी, सरकारला जाग येण्यासाठी शर्यती भरवत असल्याचे जाहीर केले होते.यापूर्वी आ. पडळकर यांनी झरे या गावी शर्यती होणार असल्याचं जाहीर केले होते. शर्यती होऊ नयेत यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती.
सुमारे हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. झरे गावाकडे येणारे रस्ते बंद केले होते. परिसरातील ९ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती.मात्रपडळकर यांनी शुक्रवारी गनिमी काव्याने शर्यतींची जागा बदलली. एका रात्रीत पाच किलोमीटरचा ट्रॅक बनविण्यात आला. या ठिकाणी शर्यती घेण्यात आल्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App