वृतसंस्था
चमन : काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर देश सोडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील बोल्दक आणि चमन येथे हजारो नागरिक दाखल होत असून ते पाकिस्तानात प्रवेश करत आहे. lot of people enter in Pakistan from Afghan border
कायदेशीररीत्या कागदपत्रे बाळगणाऱ्यांना किंवा पाकिस्तानातील नोंदणीकृत अफगाणी निर्वासितांचे प्रमाणपत्र असणाऱ्यांसाठी सीमा खुली करण्यात आली आहे. सीमेलगत अफगाणिस्तानच्या भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक नातेवाइकांसह पाकिस्तानची सीमा ओलांडत आहेत. याशिवाय तालिबानने तुरुंगातून सोडून दिलेल्या नागरिकांना नेण्यासाठी देखील सीमेवर गर्दी झाली आहे. यादरम्यान, सीमेवर अफगाण तालिबानचा पांढरा झेंडा फडकविण्यात आला असून पाकिस्तानातील नातेवाइकांनी अफगाणिस्तानच्या कैदेत असलेल्या दहशतवाद्यांचे स्वागत केले आहे.
चमनपासून ९० किलोमीटर अंतरावरील क्वेट्टात राहणारा सनाउल्लाह म्हणाला की, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने आपल्याला पकडले होते आणि बगराम तुरूंगात कैदेत ठेवले होते. या ठिकाणी अमेरिकी आणि नाटो सैनिकांचा तळ होता. अमेरिकेची घरवापसी सुरू झाल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी बगराम तुरुंग आणि हवाई तळाचा ताबा घेतला. तालिबानने आमची सुटका केली असून आम्ही सुमारे ७ हजार कैदी होतो. काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर दोन तासातच आमची सुटका झाल्याचे तो म्हणाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more