विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगेंच्या तोंडी पवार + सुळे + राऊतांचीच भाषा, पण उघड्यावर आली आंदोलनाची दिशा आणि दशा!!, असे आज अंतर्वली सराटीत घडले. The language of Pawar + Sule + Raut in the mouth of Manoj Jarang
शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे बाकीचे नेते ज्या भाषेत भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात, नेमक्या त्याच भाषेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोपांच्या तोफाचा डागल्या. अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे हे सगळे नेते देवेंद्र फडणवीसांमुळेच फुटले आणि ते भाजपला जाऊन मिळाले, असा आरोप पवार, सुळे, राऊत हे नेहमीच करत असतात. नेमका हाच आरोप मनोज जरांगे यांनी आज फडणवीसांवर खवळून केला.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेट आरोप केले. मात्र हेच सगळे आरोप आधी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि संजय राऊत आणि बाकीचे सगळे नेते करतात तेच आरोप मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अरे तुरेच्या भाषेत केले. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेकांना भाजपमधून बाहेर पडण्याची वेळ आली, तर त्यांना त्यांच्यापुढे कोण गेलेले चालत नाही. अजित पवारांना फडणवीसांमुळेच शरद पवारांना सोडवं लागलं असाही आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे म्हणाले की, कधीच अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत, पण, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणत ते तिकडे गेले, छगन भुजबळ देखील शरद पवारांना कधी सोडू शकत नाहीत, त्यांचं आणि अजित पवारांचं जमत नाही पण, देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील म्हणून अजित पवारांसोबत पटत नसून छगन भुजबळांना भाजपसोबत जावं लागलं. एकनाथ शिंदे देखील कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत, पण नाईलाजाने त्यांना माघारी जावं लागलं, तर अशोक चव्हाणांच्या घरी 3 वेळा मुख्यमंत्री पद दिलं ते देखील कधीच काँग्रेस सोडू शकत नाहीत मात्र, त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं!!
ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलं पण, ते त्यांच्या पक्षात गेल्यावर कसं काय चांगले झाले??, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. शरद पवार सुप्रिया सुळे संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तोंडी नेमकी हीच भाषा असते तीच भाषा आज मनोज जरांगे यांनी उघडपणे वापरल्याने त्यांच्या आंदोलनाची नेमकी दिशा आणि दशाच आज उघड्यावर आली!!
– मनोज जरांगे अडीच किलोमीटर चालले
मनोज जरांगे सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ झाला.*
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more