विशेष प्रतिनिधी
सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर असताना त्यांचे तुताऱ्यांच्या निनादात उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये स्वागत करण्यात आले. उदयनराजे यांचा काल वाढदिवस होता. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच जलमंदिर पॅलेस मध्ये जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. Devendra Fadnavis in Udayanraj’s Jalmandir Rajmahal
मात्र काल घरगुती कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात पोहोचू शकले नव्हते. ते आज पोहोचले आणि त्यांनी जलमंदिर पॅलेस मध्ये जाऊन उदयनराजे यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी फडणवीस यांचे तुताऱ्यांच्या निनादात जलमंदिर पॅलेस मध्ये मराठमोळे स्वागत करण्यात आले.
यावेळी उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जलमंदिर पॅलेस मधील श्री भवानी माता मंदिरात जाऊन ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्रांच्या घोषात भवानी मातेची महापूजा केली. यावेळी राजमाता छत्रपती कल्पना राजे भोसले आणि महाराणी छत्रपती दमयंती राजे भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यानंतर गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) जि. सातारा प्रकल्पाचा जलपूजन सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. लक्ष्मणराव इनामदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असताना पंतप्रधान मोदींना लक्ष्मणराव इनामदार यांनीच सातत्याने मार्गदर्शन केले.लक्ष्मणराव इनामदार यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावे सातारा जिल्ह्यात उपसा जलसिंचन योजना फडणवीस सरकारने सुरू केली होती. ती पूर्ण झाल्यानंतर तिचे जलपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App