विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ( Ladaki Bahin Yojana ) पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार आहे. याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला असून 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. जे अर्ज पात्र झाले आहेत, अशा महिलांना 3 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून पालकमंत्री असणार
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीने महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
2 ते अडीच कोटी महिलांना मिळणार लाभ
17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत.
1 कोटी अर्जांची छानणी पूर्ण झाली
तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये, महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर, नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more