वृत्तसंस्था
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी की गुप्तपद्धतीने होणार याबाबतचा फैसला आज होणार असल्याचे वृत्त आहे. हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत प्रक्रिया पार पडणार आहे. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाद्वारे निवड करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला भाजपनं आक्षेप घेतला होता. नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मतदानानाने अध्यक्षांची निवड करण्याच्या निर्णयाची प्रक्रिया पार पाडेल.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबतची प्रक्रिया पार पडणार आहे. याकरता सूचना आणि हरकतींचा विचार करुन दुपारपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीबाबतचा निर्णय जाहिर केला जाईल.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. हाच नियम महाराष्ट्रात बदलला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून यसोमवारी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला जाईल असे सांगण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील. त्यामुळे काँग्रेसमधून संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App