हिवाळी अधिवेशन : परीक्षा घोटाळ्यांवरून फडणवीसांनी सरकारला धरलं धारेवर, काळ्या यादीतली कंपनीलाच काम का दिलं?


राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या गाजत असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. Assembly Winter Session Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Of Corruption In Govt Job Exams


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या गाजत असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं.

फडणवीस यांनी पेपरफुटी प्रकरणावर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. फडणवीस म्हणाले की, आरोग्य विभागाची भरती, टीईटी परीक्षा, म्हाडा परीक्षा अशा या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याविना पार पडलेली नाही. न्यासा आणि जी.ए. सॉफ्टवेअर या काळ्या यादीतील कंपन्यांनी पेपर फोडण्यापासून अगदी सर्व उद्योग केले. एकेका पदासाठी काय बोली लागली, याचे पुरावे आहेत, ऑडिओ क्लीपही आली होती. आरोग्य खात्याच्या भरती परीक्षेत उमेदवारांना परीक्षा केंद्रेही भलत्याच ठिकाणची आली. एकट्या अमरावती जिल्ह्यातून 200 जणांनी दलालाला पैसे दिल्याचे न्यासाचा दलाल क्लिपमध्ये सांगतोय. पेपरफुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. सगळी यंत्रणाच सडली असल्याने या प्रकरणाची सभागृहात सविस्तर चर्चा होण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे केली.

जीए टेक्नॉलॉजीला काळ्या यादीतून बाहेर काढलं

फडणवीस म्हणाले की, जीए टेक्नोलॉजी पण 22 एप्रिल 2021 मध्ये शासकीय यादीवर आली. एकेका पदासाठी किती बोली लागली याचे पुरावे आहेत. पेपर फुटले, पुन्हा त्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहेत. तीन महिन्यांत काळ्या यादीतून बाहेर काढून त्यांना सर्व कामं दिली. अध्यक्ष महोदय स्थगन प्रस्ताव नाकारणार असाल तर गंभीर आहे. उद्या या गंभीर मुद्द्यावर चर्चा लावावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, फडणवीसांच्या आरोपानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, पेपरफुटीचा घोटाळा कुठून आणि कोणाच्या काळात सुरू झाला, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे जनतेला कळायलाच पाहिजे. आमच्याकडेही सर्व कागदपत्रे आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावर चर्चा होऊनच जाऊ द्या, असेही ते म्हणाले.

Assembly Winter Session Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Of Corruption In Govt Job Exams

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात