सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमडळ बैठकीत दिले निर्देश


अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांमधील विविध कारणांमुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. या  पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. The Chief Minister directed in the Cabinet meeting to start panchnama of soybean crops

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.

“जर कोणी चूक केली असेल तर त्याला…” न्यूजक्लिक प्रकरणावर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचं विधान!

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.

The Chief Minister directed in the Cabinet meeting to start panchnama of soybean crops

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात