काँग्रेस – राष्ट्रवादी आणि वंचितच्या भांडणात, भटजी बदनाम!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी यांच्या भांडणात कोणतेही भटजी ना पडले अध्यात, ना मध्यात, तरी त्यांना बदनामी सहन करावी लागत आहे. Political quarrel between Congress NCP and vanchit aghdadi, but jayant patil and prakash ambedkar targets hindu priests

कारण राष्ट्रवादी आणि वंचितचे नेते एकमेकांविरुद्ध भांडताना भटजी नावाचा वापर करून त्यांना बदनाम करीत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दयुद्धात मधल्या मध्ये भटजी भरडले जात आहेत.

तशीही राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा आमदार अमोल मिटकरी यांनी कोल्हापूरच्या सभेत भटजींना बदनाम केलेच होते. तेव्हा देखील कोणते भटजी राष्ट्रवादीच्या अध्यात किंवा मध्यात पडले नव्हतेच, तरी देखील अमोल मिटकरी यांनी भटजींच्या नावाने “मम भार्यां समर्पयामी” हा मंत्र म्हटल्यानंतर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे जोरजोरात हसले होते.
आज अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेत, पण जयंत पाटील अजून सत्तेच्या परिघाबाहेरच आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंची युती झाली असली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना अजून महाविकास आघाडीचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे त्यांची गोची झाली आहे आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी भटजींचे नाव घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहे, पण अजून आमचे लग्न झाले नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचे भटजी ते होऊ देत नाहीत, असे वक्तव्य करून प्रकाश आंबेडकरांनी आधी भटजींना बदनाम केले. त्यावर भटजी लग्न करून देत नसतील, तर तुम्ही परस्पर पळून जाऊन लग्न करा, असा सल्ला देऊन जयंत पाटलांनी भटजींची बदनामी वाढविली.

त्यावर तुमच्या मूळ भटजींची शेंडी मोदींच्या हातात आहे आणि तुम्ही अर्धेच भटजी आहात, असे प्रकाश आंबेडकरांनी जयंत पाटलांना सुनावले. फुले शाहू आंबेडकरांची नावे घेऊन महाराष्ट्रात बहुजन समाजाचे राजकारण करीत असल्याचा आव आणणाऱ्या महाराष्ट्रातल्या या नेत्यांच्या भांडणात मात्र कोणाच्या अध्यात मध्यात नसलेले भटजी अनावश्यक बदनाम केले जात आहेत.

Political quarrel between Congress NCP and vanchit aghdadi, but jayant patil and prakash ambedkar targets hindu priests

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात