छत्रपती शिवरायांचे आग्रा येथे स्मारक उभारणार केंद्र सरकार, कोठी मीना बाजारात औरंगजेबाने ठेवले होते कैदेत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांना आग्ऱ्यात कैदेत ठेवण्यात आलेल्या मीना बाजार कोठी येथे केंद्र सरकारतर्फे शिवरायांचे स्मारक उभारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथील विनोद पाटील यांच्या नेतृत्वात आग्ऱ्या किल्ल्यात आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.The central government will erect a memorial to Chhatrapati Shivaji in Agra, where Aurangzeb kept him in captivity in Meena Bazaar.

राज्यातील गडकिल्ले पर्यटकांना एकाच वेळी पाहता यावेत यासाठी सर्किट उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी केली. दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी येथे केली तर स्वराज्य सर्किट तयार करण्याची मागणी उदयनराजेंनी येथे केली.



अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने दुसऱ्या वर्षी आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये शिवजन्मोत्सवाचा अत्यंत रोमहर्षक सोहळा साजरा करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विशेष अतिथी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री एस. पी बघेल, प्रधान सचिव विकास खरगे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संयोजक विनोद पाटील यांची उपस्थिती होती.

दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा : मुनगंटीवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुमतीने दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच यावेळी हा दांडपट्टा मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला.

भारताचा भूगोल आणि इतिहास वेगळा असता

शिवराय नसते तर भारताचा भूगोल आणि इतिहास वेगळा असता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून सुटका करून घेत स्वराज्यात जाण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला, त्या मार्गावर विशेष चिन्ह उभारून विशेष ट्रेन सुरू केली पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

The central government will erect a memorial to Chhatrapati Shivaji in Agra, where Aurangzeb kept him in captivity in Meena Bazaar.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात