देशातला मोठा चंदन तस्कर , बादशाह मलिकला इडीनं केली अटक ; कुर्ल्यातल्या घरावर छापा


मुंबईच्या एका शिपींग कंपनीच्या माध्यमातून जवळपास ८००० मेट्रीक टनाहून अधिक लाल चंदनाची तस्करी करण्यात येत होती. The biggest sandalwood smuggler in the country, Badshah Malik was arrested by ED; Raid on the house in Kurla


विशेष प्रतिनिधी

मुंबई : इडीने देशातला मोठा चंदन तस्करला म्हणजेच बादशाह मलिकला अटक केली आहे. कुर्ला इथल्या त्याच्या घरावर इडीनं सोमवारी छापा मारला होता, त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री त्याला अटक करण्यात आली़.बादशाह मलिक हा अंडरवर्ल्डसोबत मिळून जगभरात लाल चंदनाची तस्करी करतो.याआधी दोन वेळा बादशाह मलिकला अटक करण्यात आली होती, पण काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर येतो,आणि पुन्हा तस्करी करायला सुरुवात करतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

२०१५ मध्ये डिआरआयनं एक रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं.या प्रकरणाशी संबंधीत ही कारवाई असल्याचं बोललं जात आहे.यामध्ये अतिशय दुर्मिळ आणि महाग असलेलं लाल चंदन तस्करी करुन परदेशात पाठवण्यात येत होतं.मुंबईच्या एका शिपींग कंपनीच्या माध्यमातून जवळपास ८००० मेट्रीक टनाहून अधिक लाल चंदनाची तस्करी करण्यात येत होती.

तेव्हाची लाल चंदनाची किंमत ३ कोटींपेक्षा जास्त होती. डिआरआयनं न्हावाशेवा बंदरावर कंटेनरला ऱोखून ही तस्करी थांबवली होती.यावेळी बादशाह मलिक आणि विजय पुजारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

The biggest sandalwood smuggler in the country, Badshah Malik was arrested by ED; Raid on the house in Kurla

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात