प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती, त्यावेळी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ठाकरे – पवार सरकारे त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद आणि मुंबई महापालिका यांच्या प्रभागांची पुनर्रचना केली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला.
तर मोठ्या ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करू
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ यात आणखी सुधारणा कण्यासाठी विधेयक क्रमांक १७ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडले, त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी मागील सरकारने जिल्हा परिषदांमध्ये प्रभाग पुनर्रचना केली होती, तो निर्णय का बदलला?, असा प्रश्न विचारला होता. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षण शिवाय जिल्हा परिषद निवडणुका घ्याव्या लागल्या असतील, हे टाळण्यासाठी मागील सरकारने निवडणुका पुढे ढकलता याव्यात, त्यासाठी कारण मिळावे म्हणून प्रभाग पुनर्रचना करण्यात आल्या होत्या, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जिथे तहसील तिथे नगरपालिका असे धोरण केले पण जिथे तेवढी संख्या नसतानाही नगरपालिका करण्यात आली आहे. तरीही ज्या ग्रामपंचायती मोठ्या असतील त्यांचे नगरपालिकेत रूपांतर करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more