नितीन गडकरींच्या वक्तव्यांचा विपर्यास; माध्यमांना कायद्याचा बडगा दाखविण्याचा इशारा!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर भाषणांमधील काही वक्तव्यांवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भारतीय जनता पार्टीला आव्हान उभे केल्याच्या बातम्या काही माध्यमे देत आहेत. या बातम्या देताना गडकरी यांच्याच भाषणांमधील काही वक्तव्यांचा विपर्यास केला जात आहे. Warning to the media to show respect for the law

या पार्श्वभूमीवर स्वतः नितीन गडकरी यांनी आज एकापाठोपाठ एक ट्विट करून माध्यमांना थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये नितीन गडकरी म्हणतात गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरुद्ध माध्यमांमध्ये काही विशिष्ट घटक माझ्या सार्वजनिक भाषणांमधील वक्तव्याचा विपर्यास करून वेगवेगळ्या बातम्या देत आहेत. सरकारला आणि माझ्या पक्षाला धोका असल्याचे भासवत आहेत. वास्तविक पाहता सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले.

परंतु, आजही काही माध्यमांनी माझ्या भाषणातील काही वक्तव्ये संदर्भहीन करून प्रसिद्ध केले आहेत. यातून त्यांचा राजकीय कुहेतू स्पष्ट होतो. अशा माध्यमांना कायद्याचा बडगा दाखवण्याला मी मागे पुढे पाहणार नाही. कारण माझ्यासाठी सरकार, माझी पार्टी आणि कोट्यावधी कष्टकरी कार्यकर्ते अधिक महत्त्वाचे आहेत. त्यांच्या हितासाठी मी विशिष्ट कुहेतूने बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही.

या ट्विट बरोबरच ते गडकरींनी आपण प्रत्यक्ष भाषणात नेमके काय बोललो होतो, हे याची यूट्यूब लिंक शेअर केली आहे.

Warning to the media to show respect for the law

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!