मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने आहेत. त्यामुळे एका मंदिरासाठी एवढे मोठे आंदोलन भारतात झाले. क्षुद्र बुद्धीने त्या मंदिराला, आंदोलनाला असं लहान ठरवायचं, संकुचित ठरवायचं असे सगळे प्रयत्न झालेले असतानाही सर्वसामान्य भारतीय पक्षाचा विचार न करता, विचारधारेचा विचार न करता, सांप्रदायाचा विचार न करता एकमुखाने त्या मंदिरामागे का उभा राहिला असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.Temples are the tools of our society, that’s why there was a big movement for a temple, says Sarsanghchalak Mohan Bhagwat

पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे या दीपा मंडलिक लिखित पुस्तकाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, सरसंघचालक म्हणाले, देशाचा गौरवमय इतिहास आपल्याला कळू नये अशी व्यवस्था, आपल्या ही पराक्रमाची प्रेरणा मिळू नये, यासाठी आवश्यक असलेली रचना आपली बनू नये, यासाठी आवश्यक असेलला भाव आपला विकसीत होवू नये या दृष्टीने आपल्या इतिहासातून ती लुप्त करण्यात आली.



आणि दुदैर्वाने स्वातंत्र्यानंतर ती चालू झाली पाहिजे अशा मंडळींचं वर्चस्व नव्हतं. ती नको पुन्हा व्हायला अशाच मंडळींचं वर्चस्व त्या क्षेत्रात होते. मंदिराकडे बघण्याची दृष्टी आपली दृष्टी कशी असावी, यासाठी हे पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. या मंदिरांनी आपला जो इतिहास पाहिलेला आहे,

त्या सगळ्या इतिहासाच्या काळात ही मंदिरं आपल्या समाज जीवानाची केंद्र होती. मंदिर ही संस्था मोक्षाच्या, अध्यात्माच्या पायावर आपल्या इथे घडलेल्या धमार्ची केंद्र आहेत. व्यक्तिगत साधाना त्यातून मोक्ष तर आहेच. पण आपलं सगळं जीवनच हे त्या पायावर उभं आहे. हाच फरक आहे भारतामध्ये आणि बाकी सगळीकडे.

भौतिकतेच्या पलिकडे बाकी लोक जाऊ शकले नाही आणि भौतिकतेचं चरम गाठल्यावर केव्हातरी एखाद्या ऋुषीला असं सूचलं की बाहेर पाहूनही सत्य सगळं गवसत नाही, तर आत पाहावं आणि अध्यात्माचा जन्म झाला. त्यातून आपल्याला एक सत्य गवसलं की सगळं एकच आहे. मग सगळं एकच आहे दृष्टी घेऊन, विविधतेने नटलेलं त्या विविधतांचा समन्वय साधत असलेलं जीवन कसं घडवावं याचं उदाहरण आपण प्रस्तुत केले.

राजांनी मंदिरं बांधली पण त्या मंदिरांवर अधिकार त्यांनी स्वत:चा ठेवला नाही. कलियुगाच्या काळात सर्वसामान्यांच्या बुद्धीचा स्तर हा जुना राहिला नसताना देखील सगुण भक्तीच्या आधाराने समजाची बांधणी राष्ट्राची बांधणी कशी होईल हे आपण पाहीलं. त्याची केंद्र मंदिरं. मंदिरांमध्ये पाठशाळा चालत असे, मंदिरामध्ये आसपासच्या परिसराचं अर्थशास्त्र घडत असे.

मंदिरामध्ये त्यावेळचा जो मुख्य आपला उद्योग शेती विषयक अनेक गोष्टी घडत असतं. मंदिरांमधून निरनिराळ्या देशांच्या व्यापारी संबंधांची जपवणूक त्या व्यापारातून आपल्या इथून तिकडे पाठवायचं ज्ञान, तिकडून इकडे आणायचं ज्ञान हे सगळं होत असे. मंदिरामध्ये समाजाचे संस्कार घडत असे. मंदिराच्या आधारे कितीतरी उभा राहतं आणि म्हणून राजे मंदिरं उभी करायची.

पराक्रमी राजे भव्य मंदिरं उभी करायचे. गंमत पाहा, राजांनी मंदिरं बांधली आपल्या पराक्रमाच्या एका अथार्ने फलऋुतीचं प्रतीक म्हणून मंदिरं बांधली, पण त्या मंदिरांवर अधिकार त्यांनी स्वत:चा ठेवला नाही. ती समाजाची मंदिरं होती, असे सरसंघचालक म्हणाले.

मंदिराची परीक्षा करायला आतमध्ये जाणाºयाला दर्शन नाही घडत. एक श्रद्धा असावी लागते, श्रद्धावान मंडळी मंदिरं चालवतात, असे सांगून सरसंघचालक म्हणाले, श्रद्धावान मंडळीच्या श्रद्धेमुळे मंदिराचं मंदिरपण असतं.

अशी ही मंदिरं ठिकठिकाणी आहेत. ती पाहिली पाहिजेत या भावनेने आणि ती पुन्हा उभी केली पाहिजेत याच भावनेने, यातलं अध्यात्मक सुदैवाने अजुनही टिकून आहे म्हणजे पाया शाबूत आहे. पण बाकीच्या गोष्टी गेल्या आणि सगळ्याच्या सगळ्या तशाच लागू होतील असं नाही.

Temples are the tools of our society, that’s why there was a big movement for a temple, says Sarsanghchalak Mohan Bhagwat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात