धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्यांबाबत डॉ. मोहन भागवत असहमत; सावरकरांच्या हिंदुत्वात देशाच्या एकात्मतेची धारणा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : धर्म संसदेत हिंदुत्व आणि महात्मा गांधी या विषयांवर व्यक्त करण्यात आलेल्या विचारांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पूर्णपणे असहमती दर्शवली आहे, त्याच वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व श्रीमद भगवद्गगीतेशी संलग्न असणाऱ्या देशाच्या एकात्मतेचे विषयी आग्रहाने प्रतिपादन करते. हिंदू समाजाला सर्व प्रकारचे भेदाभेद दूर सारून एकजूट करण्याचा संदेश देते असे प्रतिपादन केले. Dr. Dharma regarding extremist statements in Parliament. Mohan Bhagwat disagrees; Savarkar’s notion of unity of the country in Hindutva !!

“हिंदुत्व आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता” या विषयावरील परिसंवादात डॉ. मोहन भागवत यांनी हिंदुत्व संकल्पनेविषयी विस्तृत विवेचन केले. यावेळी त्यांनी हरिद्वार मधील धर्म संसदेत जी अतिरेकी वक्तव्ये करण्यात आली त्या वक्तव्यांशी पूर्णपणे असहमती दर्शवली आहे. हिंदुत्व हे कोणाचा विनाश करण्यासाठी नव्हे तर समाजाच्या संपूर्ण धारणेसाठी आवश्‍यक असे सूत्र आहे. देशाच्या राज्यघटनेने देखील याच स्वरूपाच्या सर्वसमावेशक आणि व्यापक विचारसरणीचा स्वीकार केला आहे, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.हरिद्वार मधील धर्म संसदेत हिंदुत्वावर विचारविनिमय करताना अनेक संतांनी हिंसाचाराची आणि मुस्लिमांनी विरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याची भाषा केली होती. त्याच बरोबर महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन देखील त्या धर्म संसदेत करण्यात आले होते. या दोन्ही बाबींचा बाबींशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पूर्णपणे असहमती दर्शवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाशी धर्म संसदेत मांडण्यात आलेली हिंदुत्वाचा विचार पूर्णपणे विसंगत आहे. श्रीमद भगवद्गगीतेत सांगितलेल्या धर्म धारणेनुसार सावरकरांनी हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी हिंदुत्वाचे सूत्र दिले आहे, डॉ. मोहन भागवत म्हणाले.

डॉ. मोहन भागवत यांनी धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्याची सहमती दर्शवून हिंदुत्वाच्या व्यापक भूमिकेचा पुरस्कार केल्यानंतर त्याविषयी देशभरात राजकीय आणि सामाजिक मंथन सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्म संसदेतील वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा सवाल विचारणाऱ्या लिबरल विचारवंतांना डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यातून स्पष्ट उत्तर मिळाले आहे.

Dr. Dharma regarding extremist statements in Parliament. Mohan Bhagwat disagrees; Savarkar’s notion of unity of the country in Hindutva !!

महत्त्वाच्या बातम्या