‘टार्जन’ ‘ फेम अभिनेते हेमंत बिर्जे त्यांचा भीषण अपघात , जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलला केले दाखल; तीन जण गंभीर जखमी


अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जुना ‘टार्जन’चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे, त्यांची पत्नी अमना व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. ‘Tarzan’ fame actor Hemant Birje has been admitted to Pavana Hospital for treatment of his tragic accident; Three seriously injured


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर नवी मुंबईवरून पुण्याला येताना उर्से गावच्या हद्दीत कारवरील ताबा सुटल्याने ‘टार्जन’ ‘ फेम अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा अपघात झाला आहे.दरम्यान या अपघातात एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जुना ‘टार्जन’चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे, त्यांची पत्नी अमना व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी पवना हाँस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे.अभिनेते हेमंत बिर्जे हे मुंबई वरून पुण्याला कुटुंबासह चालले होते. दरम्यान पुण्याला जाताना त्यांनी रस्त्यात काही औषध गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे बिर्जे यांना झोप येऊ लागली होती.

दरम्यान त्यातच बिर्जे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

‘Tarzan’ fame actor Hemant Birje has been admitted to Pavana Hospital for treatment of his tragic accident; Three seriously injured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात