विशेष प्रतिनिधी
धुळे : ‘लाच घ्या, पण पी.एचडी. द्या’ म्हणणाऱ्या गुरुजीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळ्यात बेड्या ठोकल्याची घटना घडली आहे. पी.एच. डीसाठी मार्गदर्शकास पन्नास हजाराची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्याशिक्षकाने केला होता. धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला बेड्या ठोकल्या. धुळे शहरातील नगाव बारी चौफुली जवळील हॉटेलमध्ये ही कारवाई केली आहे. Take a bribe, but Give me a Ph.D.; Teacher was handcuffed by the anti bribery department
बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पी.एचडी. चे मार्गदर्शक असलेल्या तक्रारदारास पन्नास हजारांची लाच देऊ केली. शिक्षक सुकेंद्र वळवी यांच्याकडून संबंधितांना वारंवार लाच घेण्यासंदर्भात बोलणे सुरू होते. त्यास विरोध केल्यानंतर देखील शिक्षक वाळवी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या बाबत अखेर तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून तक्रार दिली.
त्यानुसार टीमने धुळ्याच्या नगावबारी परिसरात असलेल्या हॉटेल बालाजी येथे सापळा लावला. यानंतर ठरल्याप्रमाणे सुकेंद्र वळवी यांना तक्रारदार यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम देत असताना रंगेहात पकडले. लाच देणार्या शिक्षका विरोधात देवपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवपूर पोलिस व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App