वृत्तसंस्था
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने पुण्याच्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर जागे झालेल्या राज्य सरकारने रखडलेल्या पदभरतीला गती दिली. मात्र, भरतीप्रक्रियेवर रोज नवीन शासनादेश निघत असले तरी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला कोणतीही ठोस सरकारी मदत मिळाली नाही, अशी खंत स्वप्निलच्या वडिलांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही त्यांना दिलेल्या तुटपुंज्या मदतीचा धनादेशही त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे परत केला आहे. Swapnil’s death speeds up MPSC recruitment process
स्वप्निलच्या आत्महत्येला वीस दिवस उलटून गेले आहेत. या घटनेनंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाच्या सदस्यांची भरती ३१ जुलैपर्यंत करण्यासह पंधरा हजार पदांच्या भरतीची घोषणा केली आहे.
सरकारच्या चुकीमुळे माझ्या मुलाची आत्महत्या
सरकारच्या चुकीमुळे माझ्या मुलाला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले. आर्थिक स्थिती ढासळली असून स्वप्निल कमावता होईल या भरवशावर आम्ही बावीस लाखांचे कर्जही घेतले होते. आज स्वप्निलला जाऊन वीस दिवस झाले असले तरी सरकारकडून आम्हाला कुठलीही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून आमची निराशाच झाली, अशी खंत स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांनी व्यक्त केली. सत्तेत नसूनही अमित ठाकरे यांनी आम्हाला दोन लाखांची मदत केली. माझ्या मुलाने जरी चुकीचे पाऊल उचलले असले तरी इतर मुलांनी धीर सोडू नये, आयुष्यात यश अपयश येत असते मात्र खचून जाऊ नका असा संदेशही त्यांनी दिला.
सरकारच्या चुकीमुळे स्वप्निलला असे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे त्याच्या परिवाराला किमान एक कोटीची तरी मदत सरकारने करावी. -उमेश कोराम, ऑल इंडिया स्टुडेंट राईट्स असो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App