कल्याण डोंबिवलीत पावसाने झोडपले अनेक भागात पाणीच पाणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. In Kalyan Dombivali Heavy rain ; water is every where in the most part

कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात पाणी साचले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. पाणी जाण्याची व्यवस्थाच केली नसल्याने पाण्यातून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एरवी विकास कामाच्या जोरदार गप्पा राजकीय मंडळी ठोकतात. आता हाच का विकास, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

In Kalyan Dombivali Heavy rain ; water is every where in the most part

  • कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाचा फटका
  •  अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले
  • कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले
  •  पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याचा परिणाम
  • विजय पाटील नगर, ओस्टीन नगर पूरसदृश्य
  • मोठा नाला नसल्याने संपूर्ण परिसर जलमय
  • विकास कामाचा नुसताच डांगोरा