विशेष प्रतिनिधी
पुणे : घड्याळ चिन्ह गेले, तुतारी चिन्ह आले त्यामुळे बारामतीतून वाजवायला तुतारी, सुप्रिया सुळे यांना आता आठवले राम कृष्ण हरी!!, असे म्हणायची वेळ त्यांच्याच भाषणांनी आले आहे. Supriya Sule now remembers Ram Krishna Hari!!
एरवी शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी अगदी राम मंदिराच्या भूमिपूजनाला देखील कोरोनाच्या नावाखाली विरोध केला होता. संपूर्ण देशभरातच, नाहीतर जगभरात कोरोना असताना कशाला जमवायची अयोध्येत गर्दी?? आणि कशाला करायचे राम मंदिराचे भूमिपूजन?,, असा सवाल शरद पवारांनी केला होता. त्याला अर्थातच सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी देखील दुजोरा दिला होता. शरद पवारांना राम मंदिराचे भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्हीही डांचले होते. त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या समारंभात जाणेही टाळले होते.
पण आता मात्र बारामतीची निवडणूक गळ्याची आली असताना सुप्रिया सुळेंना तुतारी वाजवण्यासाठी राम कृष्ण हरी आठवले आहेत. कारण त्यांचे घड्याळ चिन्ह अजित पवार पक्षाच्या नावाबरोबरच घेऊन गेले आहेत. अजित पवारांनी बटन दाबा कचाकचा असेल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मी एवढेच म्हणेन राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी!!, असे सांगितले.
आज पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत सुप्रिया सुळे यांनी त्याच घोषणाची पुनरावृत्ती केली. त्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर नेहमीची टीका केली. आपल्यावरचे संस्कार सांगितले. आपण शरद पवार – प्रतिभा पवार यांची मुलगी आणि आता शारदाबाई पवार यांची नात असल्याचीही त्यांना आठवण झाली आणि सगळ्यात शेवटी त्यांनी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी!!, अशी घोषणा देऊन आपले भाषण संपवले. एरवी धर्मनिरपेक्षतेची दुहाई देणाऱ्या पण इफ्तार पार्ट्या करण्यात पुढे असणाऱ्या सुप्रिया सुळे यांना बारामतीची निवडणूक गळ्याशी आल्यानंतर तुतारी वाजवण्यासाठी राम कृष्ण हरी आठवले, हे ही नसे थोडके!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App