विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunil Tatkare अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या खासदारांना सत्तेत सहभागी होण्यासाठी फोन केल्याचा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. सुनील तटकरे यांनी हा फोन केल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मी कधीही कुणाशी संपर्क साधला नसल्याचे तटकरे म्हणाले. तर खासदार अमर काळे यांनी नाव फोडले आहे. काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या, असे अमर काळे यांनी सांगितले.Sunil Tatkare
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती. यासाठी सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना फोन करून सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिल्याची माहिती होती. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. शरद पवार गटाच्या खासदारांना ज्यांनी फोन केला, त्यांचे नाव खासदार अमर काळे यांनी सांगितले.
सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील फोन केल्याचा दावा केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘मी कधीही कुणाशी संपर्क साधला नसल्याचे ते म्हणाले. माध्यमांमध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
काँग्रेस नेत्याचा शरद पवारांच्या खासदारांना फोन
काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या, आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चला असा आग्रह केला होता, असा दावा खासदार अमर काळे यांनी केला. विकास कामे करायची असतील, तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असेही त्या म्हणाल्याचे अमर काळे यांनी सांगितले. माझयासह निलेश लंके, भगरे गुरुजी, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा यांच्याशीही साधल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नसल्याचे ते म्हणाले. याबाबत आम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
नेमके प्रकरण काय?
केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी आणखी खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याच्या चर्चा आहेत. अशातच राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान भक्कम करण्यासाठी अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या गटातील खासदारांना आपल्याकडे वळण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. यासाठी शरद पवारांच्या खासदारांना अजित पवार गटाकडून फोन आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला होता.
सुप्रिया सुळेंचा थेट प्रफुल पटेलांना फोन
सुनील तटकरे यांनी दिलेल्या ऑफरबाबत सुप्रिया सुळे यांना समजताच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना फोन करून याबाबत विचारणा केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App