एसटीचे यांत्रिक कर्मचारी होणार वाहक आणि चालक; एसटी महामंडळाचा निर्णय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन महिने झाले तरी एसटीचा संप मिटत नाही प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतोय आहे या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एसटी महामंडळ आता यांत्रिक कर्मचा-यांना ‘चालक’ आणि वाहतूक नियंत्रकांना ‘वाहक’ म्हणून नेमणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे एसटी सेवा सुरळीत सुरु राहावी, म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. ST’s mechanical staff will be carriers and drivers; Decision of ST Corporationगेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसत आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळ घेत आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

प्रोत्साहन भत्ता देणार

एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. ज्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे, अशा कर्मचा-यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करुन त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करुन प्रवासी वाहन बिल्ला काढायचा आहे. या कर्मचा-यांना प्रतिदिन 300 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने आपल्या आदेशात केली आहे.

ST’s mechanical staff will be carriers and drivers; Decision of ST Corporation

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, IMFच्या मते 2024 पर्यंत उत्पादनात 12.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान

नथुरामावरून ‘रामायण’ : नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब; पण मग…

UP Elections : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी सासरे मुलायम यांचा आशीर्वाद घेतला, फोटो व्हायरल

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात