वृत्तसंस्था
मुंबई : सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Special song by Amrita Fadnavis on the occasion of Diwali; Share the song lines post on social media
त्यांचे हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्या हे गाणं रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे.
अमृता यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर करत या गाण्याची बातमी दिली आहे. महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या आहेत. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे.
महालक्ष्मीजी की आरती , जो कोई नर गाता, उर आनंद समाता , पाप उतर जाता ! ॐ जय लक्ष्मी माता !
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App