‘’पण तुम्ही पत्रकार पोपटलालच, तुम्ही म्हणजे …’’ असा शब्दांमध्ये शेलारांनी निशाणा साधला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्य्यावरही भाष्य केलं होतं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असा विश्वास मोदींनी देशाला दिला होता. मात्र मोदींच्या या विधानावर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आल्याचे समोर आले आहे. मोदी सूर्याचे मालक नाहीत अशा शब्दांत ठाकरे गटाने टीका केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. so we are sure that the sun of peace will rise in Manipur Ashish Shelars statement
आशिष शेलार म्हणाले, ‘’सूर्याचे कोणीच मालक नाहीत, याची कल्पना आम्हाला आहे. पण प्रभादेवीच्या गल्लीतील बसून अग्रलेख लिहीणाऱ्या पत्रकार पोपटलाल, तुम्हाला आहे का? तुमचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुम्ही तर संपूर्ण ब्रम्हांडाचे मालक असल्यासारखे वागत होतात! तुमच्या सारखे अहंकारी आणि निराशावादी आम्ही नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे की, मणिपूर मध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल.’’
याशिवाय ‘’या देशातील गुलामगिरीची मानसिकता संपेल.ब्रिटिशांनी सोडलेल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून अमृतकाळात देश तेजस्वी सूर्य प्रकाशात उजळून जाईल.तुमच्या डिक्शनरीत देशहित हा शब्द असता तर ब्रिटीशकालीन कायदे इतिहास जमा करण्याचे धाडसी पाऊल उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह याचे तुम्ही आज अभिनंदन केले असते.’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.
सूर्याचे कोणीच मालक नाहीत, याची कल्पना आम्हाला आहे.पण प्रभादेवीच्या गल्लीतील बसून अग्रलेख लिहीणाऱ्या पत्रकार पोपटलाल, तुम्हाला आहे का? ◆तुमचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुम्ही तर संपूर्ण ब्रम्हांडाचे मालक असल्यासारखे वागत होतात!◆ तुमच्या सारखे अहंकारी आणि निराशावादी आम्ही… — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 12, 2023
सूर्याचे कोणीच मालक नाहीत, याची कल्पना आम्हाला आहे.पण प्रभादेवीच्या गल्लीतील बसून अग्रलेख लिहीणाऱ्या पत्रकार पोपटलाल, तुम्हाला आहे का? ◆तुमचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुम्ही तर संपूर्ण ब्रम्हांडाचे मालक असल्यासारखे वागत होतात!◆ तुमच्या सारखे अहंकारी आणि निराशावादी आम्ही…
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 12, 2023
याचबरोबर ‘’पण तुम्ही पत्रकार पोपटलालच, तुम्ही म्हणजे नकारात्मकता, व्देष, तिरस्कार, कोतेपणा, स्वार्थ आणि अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन आहात! पण लक्षात ठेवा! 2024 ला सेवा, समर्पणाचा सूर्य उगवेल तुमच्या अहंकारी सूर्याला आणखीन मोठे ग्रहण लागेल!!!’’ अशा शब्दांमध्ये शेलारांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App