प्रतिनिधी
पुणे : खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या एका दैनिकाचा पत्रकार देवेंद्र जैन याला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार देवेंद्र जैन हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.त्याच्याविरूध्द पुणे शहरातील काही पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हयांची नोंद आहे.So called journalist Devendra Jain arrested in ransom case
रवींद्र बऱ्हाटे , पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार, संजय भोकरे आणि इतरांविरूध्द पुणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापुर्वी रवींद्र बऱ्हाटेची पत्नी आणि मुलाला देखील अटक केली होती. पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस रवींद्र बर्हाटेच्या मागावर होते.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रवींद्र बऱ्हाटेला अटक केली. त्यानंतर आज पुणे शहर पोलिसांनी देवेंद्र जैन याला अटक केली आहे. देवेंद्र जैन याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत सखोल तपास केला जाणार आहे.
जमीन व्यवहारात अनेकांची फसवणूक केलेल्या प्रकरणी मोक्का कायद्यातंर्गत गुन्ह्यातील फरार आरोपी माहिती अधिकारी कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. बऱ्हाटेसह पत्रकार देवेंद्र जैन, संजय भोकरे, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि परवेझ शब्बीर जमादार याच्यांसह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App