बारवाल्यांनी दिलेली खंडणी मुख्यमंत्री निधीसाठी होती का? देशमुखांबाबत पवारांच्या वक्तव्यावर भाजपची टीका

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticizes Sharad Pawar For His Comment On ED Raids On Anil Deshmukh

ED Raids On Anil Deshmukh :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या मुंबई व नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी साडे 9 तास सुरू होती. या धाडींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली. आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं. त्यांच्या हाती काही लागलं नाही. मग नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी केंद्रावर निशाणा साधला. पवारांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. BJP MLA Atul Bhatkhalkar Criticizes Sharad Pawar For His Comment On ED Raids On Anil Deshmukh


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या मुंबई व नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी साडे 9 तास सुरू होती. या धाडींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली. आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं. त्यांच्या हाती काही लागलं नाही. मग नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी केंद्रावर निशाणा साधला. पवारांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

भातखळकर म्हणाले की, ‘जाणते पवार म्हणतायत अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे. अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का?’ असे प्रश्न भातखळकर यांनी ट्विटरवर विचारले आहेत.

काय म्हणाले पवार?

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईवरून केंद्रावर टीका केली. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्त्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही, जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडीसारख्या यंत्रणांकडून होत आहे. हे अनेक राज्यांत होत आहे. केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत. लोकसुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असंही पवार म्हणाले.

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticizes Sharad Pawar For His Comment On ED Raids On Anil Deshmukh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात